सहा सिंहांच्या तावडी सापडलेल्या झेब्राचा थरारक व्हिडीओने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. थरारक शिकारीच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे..दुर्मिळ फुटेज ट्विटरवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सहा सिंहाच्या तावडीत सापडूनही झेब्रा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. आपले चातुर्य आणि दृढनिश्चयाच्या जोरोवर हा झेब्रा सहा सिंहांच्या तावडीतून कसा वाचतो हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.
व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते एक झेब्रा वेगात धावताना दिसत आहे, त्याच्या मागे दोन सिंह धावत आहेत. त्यापैकी एक सिंग झेब्राच्या अंगावर उडी मारून त्याला चावण्याचा प्रयत्न करतो पण झेब्रा त्याला धुडाकवून लावतो. पुढच्या क्षणी तिसरा सिंह झेब्राच्या अंगावर तुटून पडतो. वेगाच्या भरात झेब्रा त्यालाही धुडाकावतो आणि धावत राहतो. त्याच्या मागे धावणारे सिंह पुन्हा पुन्हा त्याच्यावर हल्ला करतात पण तरीही तो हार मानत नाही. झेब्रा धैर्याने त्यांचा सामना करतो. धावता धावतो तो एका सिंहाला जोरात लाथ मारून ढकलताना दिसतो. तो न थांबता धावत राहतो आणि अखेर सहा सिंहाच्या तावडीतून सुटतो.व्हिडीओ एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “झेब्रा सहा सिंहांच्या तावडीतून जिवंत सुटतो” व्हायरल व्हिडिओने ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर आला आहे, जिथे वापरकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
https://x.com/AMAZlNGNATURE/status/1805142756089614390?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1805142756089614390%7Ctwgr%5Eef1cbfe130c4a637822d33becae0e378d11b57f9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fthrilling-a-single-zebra-found-in-the-clutches-of-six-lions-lions-were-attacking-one-after-the-other-see-what-happened-at-the-end-in-the-video-snk-94-4450877%2F