Wednesday, April 17, 2024

सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांना शिवीगाळ, नगर शहरात पोलिस स्टेशनला निवेदन

नगर -दि.27 फेब्रुवारी रोजी गावरान तडका या युट्युब वरुन सरपंच योगेश सावंत याने मा.उपमुख्यमंत्री यांना अत्यंत खालच्या भाषेत अर्वाच्च शिवीगाळ करुन तीन मिनिटात ब्राह्मण समाज संपून टाकू असा धमकी वजा इशारा दिला. यानंतर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला असून, सदरील सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने कोतवाली पोलिस स्टेशनचे पो.नि.श्री.दराडे यांना दिले.

याप्रसंगी प्रमोद कुलकर्णी, हेमंत लोहगांवकर, धनंजय तागडे, नंदेश व्यास, प्रकाश जोशी, नितीन मुंगी, विजय देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, अरुण आवटी, सुबोध कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, तुषार हिरवे, संजय हिंगणे, नंदकुमार निसळ, उपेंद्र खिस्ती, सोमनाथ मुळे, अनिल देशमुख, शशिकांत वैद्य, अभिषेक शेटे, अमित शेटे, राजेंद्र पुराणिक, सचिन पानसरे, नरेंद्र कुलकर्णी, सुनिल भालेराव, लक्ष्मीकांत पारगांवकर, उल्हास मुळे आदि उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हणाले आहे की, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. 18 पगड जाती धर्मासह गुण्या-गोविंदाने आपण सगळे राहत आहोत. आमचा कुणालाही कधीच विरोध नसतो. आम्ही समाज बांधव कधी आरक्षण मागत नाही. कोणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यास आमचा विरोध नाही. आम्हा समाज बांधवांचा कायम पाठिंबाच राहिला. परंतु तथाकथित सरपंच योगेश सावंत यांच्या चिथावनीखोर वक्तव्याने समाज बांधवांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

कोतवाली पोलिस स्टेशनला निवेदन देण्याअगोदर सकल ब्राह्मण समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन निदर्शने केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles