Monday, July 22, 2024

शिक्षणाधिकारी साहेब राज्यपालांच्या आदेशाच काटेकोर पालन करा अन्यथा…

अहमदनगर (प्रतिनिधी) राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार विधानसभेत परिपत्रक काढून प्राथमिक शाळा, प्रि, प्रायमरी स्कूल सकाळी साडेसात ऐवजी नऊ वाजता भरवाव्यात या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे युवासेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी म्हटले आहे.
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना त्यांनी निवेदन दिले आहे. यावेळी युवासेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड ,यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी भाऊ वाकळे, जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे सर, उपशहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे, शुभम मिरांडे,अमित लड्डा, श्याम सोनवणे, सुमित धेंड, गुड्डू भालेराव, कालू जग्गड, ओंकार सातपुते, गौरव ढोणे, उमेश काळे, सुनील भोसले, आनंद राठोड, सचिन गोंधळे, बाळू जरे, अक्षय नागपूरे,प्रशांत पाटील,अशोक दहिफळे, सुरेश शिरसागर, अरुण झेंडे, डॉ. श्रीकांत चेमटे व इतर युवासैनिक शिवसैनिकआदी पदाधिकारी उपस्थित होते
यात त्यांनी म्हटले आहे की, नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून कोवळ्या वयातील मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे सुचवण्यात आले आहे.
त्यात सकाळी साडेसात ऐवजी सकाळी नऊ वाजता ही वेळ शाळा सुरू करण्यासाठी ठरवण्यात आली आहे . नगर शहरातील काही प्री प्रायमरी स्कूल ही वेळ पाळतात पण शहरातील बऱ्याच शाळा या सरकारी नियमाला केराची टोपली दाखवतात. विद्यार्थ्यांचे पालक यांनी याबाबत तक्रार केली त्या पालक आणि विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो.आपल्या हेकेखोर वृत्तीने संस्थाचालक आणि स्कूलचे प्राचार्य इतर स्टाफ मनमानी पद्धतीने सकाळी साडेसातला नियमितपणे वर्ग भरवतात. हे चुकीचे आहे. शिक्षक आणि संस्थाचालक आपल्या वेळेचा विचार करून हे राबवत आहेत. वास्तविक सकाळी सकाळी शाळेची तयारी करताना मुलांना पहाटे पाच साडेपाचलाच उठावे लागते तर वेळेत ते पोहोचतात.
एकूण बदलत्या दिनाकर्माचा विचार करतात मुले हुशार झोपतात आणि सकाळी लवकर उठतात त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. आणि त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. येणारी पिढी तल्लख तजेलदार वाटत नाही. पर्यायाने त्याचा बुद्धिमत्तेवर देखील परिणाम होतो.
हे टाळण्यासाठी नव्या शोधा नुसार सकाळी नऊ वाजता शाळा करणे आवश्यक आहे. शिक्षक आपल्या सोयीनुसार सकाळी सात ते दहा मध्ये सगळे आटोपले की दिवस आपल्याला मोकळा भेटतो या आशेने सकाळी नऊला शाळेचे वेळापत्रक बदलयाला तयार नाहीत. ऊन ट्रॅफिक याचा त्रास त्यांना नको आहे.
पण शासनाने नवे नियम जे केले ते चुकीचे पद्धतीचे नाहीत. तेव्हा नऊ वाजता शाळा सुरू व्हावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने या शाळांच संस्थाचालकांना धडा शिकवेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles