Thursday, July 25, 2024

मनोज जरांगे यांच्या गावात दगडफेक पोलिस पथक तैनात,घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडें म्हणाले…

बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या गावात दगडफेक झाल्याचे उघडकीस आले आहे. जरांगे यांच्या मातोरी गावत काल (गुरूवार) संध्याकाळी दगडफेक झाली, त्यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. दोन गटांमध्ये दगडफेक झाल्यानं गावामध्ये तणावाचं वातावरण होतं. मात्र ही दगडफेक नेमकी का झाली त्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांची दोन पथक गावात तैनात करण्यात आली असू कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मातोरी गावात दगडफेक झाल्याचं वृत्त कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मातोरी गावाच्या बस स्टँडवर आणि आसपासच्या परिसरात दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनेक बाईक, डीजेचे नुकसान झाले आहे.

मनोज जरांगे यांचं बीड जिल्ह्यात मातोरी गाव आहे. याच गावात काल रात्री ८-८.३० च्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि दोन्ही गटातील तरूणांनी एकमेकांवर दगड-गोट्यांचा मारा केला. जवळपास अर्धा ते पाऊण तास ही दगडफेक सुरू होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामध्ये अनेक गाड्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या गावात तणावपूर्ण शांतता आहे. अनेक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. गावात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साधरणत: दीडशे ते दोनशे पोलिसांचा ताफा गावात आहे.

दरम्यान मातोरी गावातील दगडफेकीच्या या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1806369478290379072?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1806369478290379072%7Ctwgr%5Ee012079c1d59067c3c305ced804641bd827fa500%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fstone-pelting-in-manoj-jarnages-village-materi-reason-unknown-yet-1225174.html

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles