अहमदनगर – पांढरी पुल येथील दुपारी झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार अहमदनगर मार्गे डांबराचे बॅरल घेऊन जाणारा कंटेनर पांढरी पुल येथील इमामपुर घाटात आल्यावर ड्रायव्हरचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने कंटेनर घाटातच आडवा झाला.
त्याच वेळी समोर येणारे पिक अप, व्हॅन देखील त्यावर जाऊन आदळे त्याच वेळी बाजुलाच असलेले खरवंडी येथील अनिल दगडु फाटके (वय ४३) व मुलगी दिपाली अनिल फाटके (वय २०) हे दोघे मुलीच्या अॅडमिशनसाठी नगर येथे जात होते. त्याच वेळी कंटेनर मधून बाहेर पडलेले डांबराचे बॅरल त्यांच्या अंगावर आले.
गाडी कंटेनर वरती आदळली त्यामध्ये अनिल फाटके रा. खरवंडी ता. नेवासा हे जागीच मयत झाले तर मुलगी जखमी झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटना स्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आपल्या सहकाऱ्यांसोबत काही वेळातच घटना स्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते.