या व्हिडीओत एक विद्यार्थी “तुझमे रब दिखता है…” या गाण्यावर शिक्षकांसह डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही तुमच्या शिक्षकांची किंवा शाळेची आठवण येऊ शकते.
हा व्हायरल व्हिडीओ शाळेच्या एका वर्गखोलीतील आहे. एका बाजूला बाकांवर शिक्षिका बसलेल्या आहेत, तर आजूबाजूच्या बाकांवर विद्यार्थी बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये पुढे दिसेल की एक विद्यार्थी “तुझमे रब दिखता है…” गाण्यावर सुंदर डान्स करत आहे.
डान्स करताना मध्ये मध्ये तो सर्व शिक्षकांच्या पाया पडतो. पुढे एका शिक्षिकेबरोबर तो डान्ससुद्धा करतो. या विद्यार्थ्याचा डान्स पाहून सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षिका टाळ्या वाजवताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण येऊ शकते.