अहमदनगर-डॉक्टर जातीला काळीमा फासणारी घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना आजारी पडल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ.कुटे हॉस्पीटल येथे गेलो. तेथे कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे डॉ.रवींद्र कुटे आले. त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले. तेव्हा डॉ. कुटे यांनी तपासतांना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून लैंगीक अत्याचार केला. तेव्हा मैत्रीण व रेक्टर मदतीला आल्या असता तेथील कर्मचारी महिलेने व डॉक्टर कुटेने शिवीगाळ केली व झाडूने मारले. यावेळी पिडीता व तिच्या बरोबरील दोघी प्रचंड घाबरून गेल्या.
याप्रकरणी पीडीत विद्यार्थीनिने श्रीरामपूर शहर पोलीसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉक्टर रवींद्र कुटे व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोनि.नितिन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता डॉ.कुटे याच्यावर जबरी संभोगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोसई. मगरे हे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.