Saturday, December 9, 2023

नवीकोरी कार जीवावर बेतली, शिक्षकाचा सासरी जाताच कारसह विहिरीत बुडून मृत्यू

नवीन कारमध्ये शिक्षकांच्या जीवावर बेतल्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. नवीन कार घेतलेल्या आनंदात असलेल्या कुटुंबावर ५-६ दिवसातच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवीन कार घेतलेल्या शिक्षकाचा कार विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. सोलापुरातील भाटेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

ईरन्ना बसप्पा जूजगार असं ४१ वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. ईरन्ना यांना गाडी घेतल्याचा खूप आनंद झाला होता. आनंद साजरा करण्यासाठी ते कुटुंबियांसह कार घेऊन आपल्या मेहुण्याच्या घरी गेले होते. कार चालवता येत नसल्याने खासगी ड्रायव्हर घेऊन ते मेहुन्याच्या घरी पोहोचले होते

तिथे पोहोचल्यानंतर ईरन्ना यांना मोकळी जागा दिसल्याने गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे गाडी चालवण्यासाठी ते ड्रायव्हिंग सीटवर बसले. मात्र गाडी चालवण्याचा अंदाज नसल्याने त्यांचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट शिवारातील विहिरीत कोसळली.घटनेनंतर गावातील लोकांना तातडीने ईरन्ना यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासाभरानंतर ईरन्ना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. बेशुद्ध अवस्थेत ईरन्ना यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत शिक्षक ईरन्ना यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d