सोशल मीडियावर शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी शिक्षकांचे व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या असाच एका शिक्षिकेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका डान्स करत करत मुलांना शिकवत आहे. शिक्षिकेच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हिडीओ पाहून काही लोक थक्क होतील तर काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील वर्गखोलीतील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्यांना “अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए , ऐ, ओ, औ, अं, अः आणि अँ हे १४ स्वर शिकवत आहे. मुलांना लक्षात राहावे म्हणून शिक्षिका अनोख्या पद्धतीने शिकवताना दिसत आहे. ती प्रत्येक स्वर शिकवताना डान्स करून दाखवत आहे जेणेकरून विद्यार्थी हे स्वर विसरणार नाही. शिक्षिकेच्या पाठोपाठ विद्यार्थी सुद्धा डान्स करत उत्साहाने हे स्वर शिकताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.