Saturday, February 15, 2025

मोहटा देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना दुचाकींच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मोहटा देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना एका महिला देवी भाविकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना ही मंगळवारी सकाळी घडली आहे. काशीबाई सुखदेव दसपुते (रा. आडगाव जि. छत्रपती संभाजीनगर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. काशीबाई त्यांचे पती सुखदेव दसपुते व नातेवाईकांची मुलगी असे तिघेजण दुचाकीवरून मोहटा देवीच्या दर्शनासाठी आले होते.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर मढीकडे दर्शनासाठी निघाले असताना बीड- पाथर्डी राज्य मार्गावरील हंडाळवाडी शिवारातील मूकबधीर शाळेनजीक दत्त मंदिरासमोर एका दुचाकीने दसपुते यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर मागे बसलेल्या काशीबाई दसपुते या खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या जखमी झाल्या होत्या. काशीबाई यांना तात्काळ पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल आव्हाड करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles