video: अतिउत्साह महिलेला नडला! खवळलेल्या समुद्रात लाट आली अन् महिलेला क्षणात

0
59

नुकताच व्हायरल झालेला एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे. यावेळी काही तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत. यावेळी पिवळ्या साडीत एक महिलाही तिथे दिसत आहे. सुरुवातीला किनाऱ्यावर उभी असलेली महिला हळू हळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते. यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही. आणि ती लाटेसोबत समुद्रात खेचली जाते. ती उठण्याचा प्रयत्न करते तेच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचते.

दरम्यान किनाऱ्यावर असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो, बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात येत. त्या तरुणाचं लक्ष गेलं म्हणू महिलेचे प्राण वाचले अन्यथा महिलेचा जीव गेला असता.