Wednesday, April 17, 2024

कुस्ती खेळताना जखमी झालेल्या अहमदनगरमधील पैलवानाचे उपचारादरम्यान निधन

अहमदनगर-कुस्ती खेळताना जखमी झालेल्या तरुण पैलवानाचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी (दि. ७) दुपारी दुर्दैवी निधन झाले. विकी गायकवाड (वय २०, रा.गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे या मयत पैलवानाचे नाव आहे.

विकी गायकवाड हा पारनेर येथील शिवछत्रपती कुस्ती संकुल येथे सराव करत होता. दि. २५ फेब्रुवारी रोजी रांधे (ता.पारनेर) येथील कुस्ती मैदानात त्याची कुस्ती होती. कुस्ती खेळत असताना त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आणि उपचाराचा खर्च मोठा असल्याने त्याच्या साठी नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक तालमींनी व पैलवान यांनी मदत निधी जमा केला होता.

नगर तालुक्यातील विष्णू खोसे स्पोर्ट्स फाँडेशन व जय बजरंग तालीम सारोळा कासार यांच्या कडूनही १ लाखांची मदत करण्यात आली होती. अनेक कुस्ती प्रेमींनीही मदतीचा हात पुढे केला. मात्र पैलवान विकी गायकवाड याची २ आठवड्यांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली व त्याचे गुरुवारी (दि.७) दुपारी निधन झाले. गोलेगाव येथे रात्री उशिरा त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे.पैलवान विकी गायकवाड याच्या दुर्दैवी निधनाने नगर व पुणे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles