सध्या महाराष्ट्रात ‘डान्स’ हा शब्द जरी उच्चारला तरी गौतमी पाटीलचे नाव समोर येते. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण सध्या गौतमी पाटीलला टक्कर देणाऱ्या एका तरुणाचा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण एका लावणीवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत लहानांपासून वृद्धापर्यंत सर्व खाली बसलेले दिसत आहे आणि हा तरुण सर्वांसमोर डान्स करताना दिसत असेल. “तुम्हा बघुन तोल माझा गेला” या लावणीवर तरुण सुंदर डान्स करताना दिसत आहे. तरुणाच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गौतमी पाटीलला टक्कर देणारा डान्स या तरुणाने केला आहे. त्याचा डान्स पाहून लोकं सुद्धा टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवताना दिसत आहे.