एक फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं चक्क शेतात प्री वेडींग फोटशूट करताना दिसत आहे. जोडप्याचा हा फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्ही आजवर अनेक फोटोशूट पाहिले असेल पण हा फोटोशूट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जोडपं शेतामध्ये फोटोशूट करत आहे. तरुण मुलगा शेतकऱ्याच्या वेशभूषेत असून त्याने धोतर नेसले आहे आणि पांढरा सदरा घातला आहे. डोक्यावर पागोटा बांधला आहे आणि तरुणीने नऊवारी नेसली आहे. मराठी वेशभूषेत हे तरुण तरुणी खूप सुंदर दिसत आहे. हे जोडपे हातात काठी घेऊन नाचताना दिसत आहेत. व्हिडीओत तुम्हाला कॅमरामॅन सुद्धा दिसेल जो शुट करताना दिसतोय.
विशेष म्हणजे या प्री वेडींग फोटशूटमध्ये या जोडप्याच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. व्हिडीओत तुम्हाला इतर महिला सुद्धा दिसतील ज्या मराठमोळ्या वेशभूषेत दिसत आहे. या जोडप्याचा कुटुंबाबरोबर केलेला हा अनोखा फोटोशूट कोणालाही आवडेल