सोशल मीडियावर एका दिव्यांग तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या दिव्यांग तरुणाने चक्क बंजी जंपिग करण्याचा धाडसं केलं आहे. बंजी जंपीग म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. उंचावरून हवेत उडी मारणे काही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अनेकजण बंजी जंपिगचे करण्याचे स्वप्न पाहतात पण प्रत्यक्षात जेव्हा बंजी जंपिग करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा आत्मविश्वास डगमगतो, पाय थरथरतात. देवाच्या नावाचा धावा करत लोक बंजी जपिंग करताना दिसतात. पण या दिव्यांग तरुणाने मोठ्या धैर्याने बंजी जंपिग करण्याचा धाडस केलं आहे जे पाहून सर्वत्र त्याचे कौतूक होत आहे.
व्हायरल व्हिडीओ rishikeshadventure नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. दिव्यांग तरुणाचा बंजी जंपिग करतानाचा रोमाचंक व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक दिव्यांग तरुण व्हिलचेअरवर बंजी जंपिग करण्याचासाठी सज्ज असल्याचे दिसते. हा तरुण आपल्या मित्रांबरोबर बंजी जपिंगचा आनंद घेताना दिसत आहे.