Wednesday, February 12, 2025

विहिरीवरील शेतीपंप चालू करताना विजेचा शॉक बसून नगर तालुयातील तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

नगर – शेतातील विहिरीवर वीजपंप चालू करायला गेलेल्या तरुण शेतकर्‍याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील जखणगाव शिवारात वाळके मळा येथे रविवारी (दि.९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. जावेद बशीर शेख (वय ३७, रा. जखणगाव, ता.नगर) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. मयत जावेद शेख हे रविवारी (दि.९) दुपारी जखणगाव शिवारात वाळके मळा येथे असलेल्या शेतात गेले होते. तेथील विहिरीवर असलेला वीज पंप चालू करण्यासाठी ते गेले असता त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. त्यामुळे ते खाली पडून बेशुद्ध झाले. त्यांना त्यांचे नातेवाईक सलमान नजीर शेख यांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. बोठे यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस स्टेशनचे पो. हे.कॉ. जी. जी. गोर्डे यांनी नगर तालुका पोलिसांना कळविली. या माहिती वरून तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जावेद शेख यांच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ, पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles