Saturday, December 7, 2024

नगर तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा नादखुळा !डाळिंबाला किलोला मिळाला ५०१ रूपयांचा भाव

डाळिंबाला किलोला मिळाला ५०१ रूपयांचा भाव : यावर्षिच्या हंगामातील सर्वोच्च भाव

शेतीतून काहीच उत्पन्न मिळत नाही असं नेहमीचं रडगाणं गाणाऱ्या काही शेतकऱ्यांना नगर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने मोठी प्रेरणा दिली आहे . या शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुण्याच्या मार्केट कमिटीच्या लिलावात प्रति किलो ५०१ रूपयांचा भाव मिळाला आहे . यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे . या हंगामातुन दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा निर्धार या युवा शेतकऱ्याने केला आहे .

नगर तालुक्यातील पोखर्डी येथील अक्षय संजय कराळे या तरूणाने शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वःताला शेतीत झोकुन दिले . अरणगाव ( ता. नगर ) येथील १० एकर क्षेत्रात गेल्या १२ वर्षांपासुन तो डाळिंबाची लागवड करतो . मोठ्या कष्टाने या शेतीची तो राखण करतो .
पुणे बाजार समितीत त्याने सोमवारी आपले डाळिंब विक्रीला नेले . तेथील घाऊक बाजारात त्याच्या डाळिंबाला प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला . हंगामातील यंदाचा हा उच्चांकी भाव मानला जातो .
सध्या डाळिंबाचा हंगाम सुरू आहे . जानेवारी महिन्यापर्यंत हा हंगाम टिकुन राहणार आहे . सध्या डाळिंबाला चांगले भाव मिळत असल्याने बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे . घाऊक बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो प्रमाणे १०० ते ४०० रूपये प्रमाणे भाव मिळत आहे . यंदा काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने डाळिंब जपण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे . अक्षय कराळे यांचा माल सर्वात दर्जेदार असल्याचे निदर्शनास आल्याने पुण्याच्या बाजार समितीत अक्षयच्या डाळिंबाला ५०१ रूपयांचा विक्रमी भाव मिळाला . यदांच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे .

नगरचे डाळिंब विक्रीसाठी पुण्याला

नगर मधील डाळिंब उत्पादक शेतकरी नगरच्या बाजारापेक्षा पुण्याच्या बाजारात माल विक्रीसाठी नेत आहेत . पुण्याला फळांचे मोठे मार्केट आहे . तेथे खरेदीदार व्यापाऱ्यांची रेलचेल आहे . पुण्यातील डाळिंबाची थेट परदेशात निर्यात होते . मालाला भाव ही चांगला मिळतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .

पुण्यातील व्यापाऱ्यांकडून नगरच्या शेतकऱ्याचा सन्मान

यदांच्या डाळिंबाच्या हंगामातील सर्वात दर्जेदार माल असल्याने नगरचे युवा शेतकरी अक्षय कराळे यांच्या मालाला सर्वोच्च भाव मिळाला . यामुळे पुणे बाजार समिती , पुणे आडते असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या वतीने अक्षय कराळे या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला .

मी गेल्या १२ वर्षांपासुन डाळिंबाची लागवड करतो . यंदाच्या हंगामात १२५ टन माल निघणार आहे . यातुन जवळपास २ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे . यंदाच्या हंगामात माझ्या डाळिंबाला सर्वोच्च भाव मिळाला . “—-अक्षय संजय कराळे ( शेतकरी , पोखर्डी , ता . नगर )

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles