पर्यटकांसाठी अलिबाग, गोवा या ठिकाणी समुद्रावर वॉटर स्पोर्ट्स यांचे आयोजन केले जाते. बोटिंग, विविध वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग आदी अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. तर आज गावाकडच्या तरुणाने तलावाच्या पाण्यात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे. तरुणाने पाण्यात चालणारी सायकल तयार केली आहे, जे पाहून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल.
सगळ्यात आधी व्हिडीओत तरुण तयार केलेल्या खास सायकलची (Water Cycle) एक झलक दिसते. एखाद्या बाईकच्या रचनेप्रमाणे ही खास पाण्यात चालणारी तीनचाकी सायकल तयार केली आहे. तीनचाकी सायकल चालवण्यासाठी हॅन्डल, तर बसण्यासाठी सायकलप्रमाणे सीट आहे.’ तसेच फक्त चाकांच्या जागी तीन मोठ्या ट्यूब्स लावण्यात आल्या आहेत. कारण – पाण्यात सायकल घेऊन उतरलेली व्यक्ती पाण्यात बुडणार नाही असे यामागील उद्दिष्ट्य आहे ; असे तरुण व्हिडीओत सांगताना दिसतो आहे. तरुणाने कशाप्रकारे पाण्यात चालणारी सायकल तयार केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…