Saturday, March 2, 2024

रिफ्लेक्टरविना रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून तरूणाचा मृत्यू,नगर- कल्याण महामार्गावरील

रिफ्लेक्टरविना रस्त्यावर उभ्या केलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून तरूणाचा मृत्यू झाला. वृषभ देविदास खरमाळे (वय 25 रा. भांडगाव ता. पारनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे. गुरूवारी (दि. 25) रात्री साडेअकरा वाजता नगर- कल्याण महामार्गावरील हिंगणगाव फाट्याजवळील मंजिरी दूध डेअरी समोर जखणगाव (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.

मयत वृषभ खरमाळे याचा भाऊ सिध्देश संदीप खरमाळे (वय 27 रा. भांडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृषभ गुरूवारी रात्री त्याच्या मोपेड दुचाकीवरून नगर- कल्याण रस्त्याने जात असताना हिंगणगाव फाट्याजवळील मंजिरी दूध डेअरी समोर जखणगाव (ता. नगर) शिवारात रिफ्लेक्टरविना रस्त्यावर उभ्या केलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसली. या धडकेत जखमी झालेल्या वृषभ यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जे.डी.जंबे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles