शाळेतून घरी जाणाच्या अल्पवयीन मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या युवका विरोधात नगर तालुका पोलीस ढाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल संजय ढंगे (रा. टाकळी काझी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडिताने फिर्याद दिली आहे.
सदरची घटना १५ डिसेंबर रोजी व २४ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास नगर तालुक्यातील एका गावात घडली. फिर्यादीची विशाल सोबत ओळख असून त्याने फिर्यादीच्या मैत्रिणीकडे मोबाईल देऊन त्यावर फोन व व्हिडीओ कॉल करत होता. त्यावेळी फिर्यादी बोलणे टाळत असे तरीही तो वारंवार फोन करून त्रास देत होता. २४ डिसेंबर रोजी फिर्यादी शाळेत गेली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना विशाल याने तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. हात पकडून ‘तु मला खूप आवडते, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, असे म्हणून गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घडलेला प्रकार पीडिताने घरी सांगितल्यानंतर ३० डिसेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल ढगे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग करीत आहेत.