नगर – रेल्वे गाडीची धडक बसून नगर मधील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना निंबळक शिवारात बुधवारी (दि.३१) दुपारी घडली. अमोल दिनेश आगरकर (वय ३२, रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) असे मयताचे नाव आहे.
अमोल आगरकर हा निंबळक शिवारात बायपासच्या पुढे असलेल्या रेल्वे मार्गाजवळ बुधवारी दुपारी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला त्याच्या चुलत भावाने दुपारी ४.३० च्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ.खेडकर यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्यातील स.फौ. जठार यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविली. त्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मयत अमोल याच्यावर नालेगावच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अमोल च्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा असा परिवार आहे.