Wednesday, January 22, 2025

पाथर्डी तालुक्यातील तरुणाची टॉवरवरून उडी मारून आत्महत्या

पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव-पवळवाडी लोहसर-धारवाडी-मिरी या परिसरात बुधवारी (4 डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजेदरम्यान थरारक घटना घडली. परिसरातील सुमारे शंभर फुट उंचीच्या टॉवरवरून बाळेवाडी येथील एका 32 वर्षांच्या तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. गोरख घुले असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील वैजूबाभळगाव-पवळवाडी लोहसर-धारवाडी-मिरी या परिसरातून नव्याने कुकाण्याकडे 132 केव्हीची नवीन टॉवर लाईन टाकण्यात आली आहे. एका टॉवरची उंची सुमारे शंभर फूट असून बुधवारी गोरख घुले या तरुणाने या टॉवरवर चढून खाली उडी मारल्याने त्याचा या घटनेत दुर्दैव मृत्यू झाला आहे. पाथर्डी पोलीस ठाण्याचे (Pathardi Police Station) सहाय्यक उपनिरीक्षक विलास जाधव, हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर, कॉन्स्टेबल भगवान टकले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोरख घुलेचा मृतदेह पाथर्डी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles