Thursday, July 25, 2024

सत्तेचे भुकेले! महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती दाखवणारा तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात.अनेकदा काही जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशाच एक रॅप सुद्धा पुन्हा व्हायरल होत आहे. काही लोकांना हा रॅप कदाचित ऐकला असेल तर काही लोक पहिल्यांदा ऐकतील. या रॅपमध्ये ‘सत्तेचे भुकेले’ म्हणत नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. हा रॅप ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. महाराष्ट्राची खरी राजकीय परिस्थिती दाखवणारा हा रॅप आहे.

लोकप्रिय रॅपबॉसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो वेगवेगळे लोकेशन दाखवत अत्यंत तालासुरात रॅप म्हणताना दिसत आहे. रॅप खालील प्रमाणे –
सत्तेचे भुकेले उपाशी हे सारे
म्हणतात हे स्वत:ला जनतेचे नोकरं..
फिरायला यांना एसीची गाडी अन् राहायला यांना हॉटेल फाकडं..
कसा चा जनादेश कसाचं काय..
अरे निवडुन दिले ते सत्तेत नाय..
यांचे नेते गेले त्यांच्या पक्षात अन् प्रत्ये पक्ष फुटलेला हाय
दुर्भाग्य माझ्या महाराष्ट्राचं माझ्या राज्याला विरोधी पक्षच नायं..
कोण इथं साफ अन् दुधाने धुतलेला
प्रत्येक नेता चिखलात माखलेला..
खरं बोलणाऱ्याला इडीची धाड
लोकसत्तेच्या नावानं हुकूमशाही
अन् तोंड दाबुन वर बुक्याचा मार
जनता बिचारी.. महागाईत बेजार आहे
कसा कष्ट भरा टॅक्स
जय महाराष्ट्र..
सत्तेचे भुकेले पर्वा नाही जनतेची सत्तेचे भुकेले..
नेत्यांच्या नावाने भरतेय चोरांचे.. सत्तेचे भुकेले..

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles