Monday, April 22, 2024

भररस्त्यात तरुणावर तलवारीने चॉपरने हल्ला, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर -शिर्डीत सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसेच चॉपरने हल्ला चढवला साईमंदिरच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील भर बाजारात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सूर्यकांत शशिकांत वाणी (वय २४) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी निखिल महादेव सोनवणे , आर्यन राजकुमार पाटील , प्रदीप सुनील सोनवणे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास सूर्यकांत हा साईमंदिरच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील बाजारपेठेत उभा होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी वाद घालत सूर्यकांतवर तलवार तसेच चॉपरने हल्ला केला

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles