Wednesday, April 30, 2025

नगर तालुक्यात घाटात तरुणाचा खून ! चार जण पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर-इमामपूर येथील तरुणाचे चौघांनी अपहरण करून मारहाण केली व त्याला अज्ञातस्थळी सोडून दिल्याची घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी आठच्या दरम्यान इमामपूर(ता. नगर) शिवारात घडली. शुक्रवारी त्या तरुणाचा शेंडी (ता. नगर) शिवारातील एका शेतात मृतदेह आढळून आल्याने
खळबळ उडाली आहे. हनुमंत दामोदर आवारे (वय २७ रा. इमामपूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्यानुसार कारवाई होईल. चौघांना ताब्यात घेण्यात आल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

याप्रकरणी कृष्णा आवारे ( इमामपूर,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळू छबू भगत (रा. शेंडी ता. नगर), शुभम भाऊसाहेब आहेर (रा. वडगाव गुप्ता ता. नगर)यांच्यासह दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला होता. चौकशी होऊन त्यातखूनाचे कलम वाढवण्यात येणार आहे. गुन्हादाखल होताच बाळू व शुभम यांना अटक करण्यात आली असून आणखी दोघांना शुक्रवारी ताब्यात घेतले. बुधवारी रात्री आवारे हे त्यांच्या साईसेवा हॉटेलजवळीलगोठ्यात असताना बाळू, शुभम व इतर दोघांनी हनुमंत यांचे अपहरण केले. यांना मारहाण करून अज्ञातस्थळी सोडून दिले. ते घरी न आल्याने फिर्याद दाखल झाली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles