Saturday, January 18, 2025

Video:शेतात दिसलेल्या अजगराला पकडण्यासाठी शेतकऱ्याची लेक करतेय तारेवरची कसरत

विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आजपर्यंत असे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अनेकदा साप पकडणाऱ्या व्यक्तींचेदेखील असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, आताही एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणी त्याला पकडताना दिसत आहे.

तरुणींना अनेकदा विविध गोष्टींवरून ट्रोल केलं जातं, त्यांची खिल्ली उडवली जाते. पण, सर्वच मुली सारख्या नसतात. काही मुली खूप धाडसी आणि हुशारही असतात. अशाप्रकारचेच एक उदाहरण देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणी भल्या मोठ्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी शेतात भात लावायला गेली असून यावेळी तिला एक अजगर दिसतो. अजगराला पाहून घाबरुन न जाता ती सरळ त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. पण, तो तिच्या हातातून सटकतो. त्यानंतर ती पुन्हा त्याच्या मागे जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. या तरुणीचं हे धाडस पाहून नेटकरी तिचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर तरुणीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @aartiyadav7082
या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles