अहमदनगर संगमनेर : तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात कुटुंबीयांसमवेत राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यामुळे संगमनेरातील २४ वर्षीय युवकाविरोधात शनिवारी (दि.०२) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याने
मुलीला घोटी (ता. इगतपुरी, जि.नाशिक) येथील एका हॉटेलात नेऊन अत्याचार केले. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.शोएब अख्तार शेख (वय: २४, रा.संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
शेख याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्याने तिला घोटी येथील किनारा हॉटेल येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ५ जुलै २०२३ ते २९फेब्रुवारी २०२४ या ८ महिन्यांच्या काळात अत्याचार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार अधिक तपास करीत आहेत. त्यांनी शेख याला शनिवारी रात्री उशिरा त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करत रविवारी (दि.०३) न्यायालयात हजर केले असता ६ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.