अहमदनगर -गणपती विसर्जन मिरवणूक संपवून घरी जात असलेल्या युवकाला तरुणीने धारदार वस्तूने मारून जखमी केले. सुरज राजू केदारे (वय 20 रा. उभा मारूती जवळ, बोल्हेगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात काल, बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा येवले (रा. गौरी घुमट, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. फिर्यादी हे मंगळवारी रात्री नगर शहरातून निघालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक संपल्यानंतर ते घरी जात असताना गांधी मैदानाजवळ रात्री 1:20 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या ओळखीची मनीषा येवले त्यांना भेटली. तिने त्यांना बोलायचे आहे म्हणून बाजूला नेले व तेथे गेल्यानंतर तिने धारदार वस्तूने त्यांच्यावर वार केले. यात फिर्यादी जखमी झाले. त्यांना एकाने उपचारासाठी रुग्णालयात नेले. अधिक तपास पोलीस करत आहेत.