सरकारने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. या आधी केंद्र सरकारने जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. UIDAI वेबसाइटवर जाऊन मोफत आधार अपडेट करण्यासाठी सरकारने सांगितलं होतं आणि यासाठी 14 डिसेंबर 2023 ही मुदत दिली होती. आता ही मुदत 14 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.UIDAI वेबसाइटवर तुम्ही ऑनलाईन अपडेट करू शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करु शकता. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
- Advertisement -