आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी प्रथम 14 जून 2024 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देत ती तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची एक संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
यूआयडीएआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार लाखो आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी 14 जून 2025 पर्यंत मोफत ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा कायम ठेवत असल्याचं म्हटलं आहे. ही सुविधा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असेल. यूआयडीएआय लोकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.