Monday, April 28, 2025

Aahmednagar accident.. मुलीला भेटायला निघालेल्या आईचा ट्रकखाली मृत्यू,महिलेचा पती जखमी

कोपरगाव : लोणी येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आईचा अपघाती मृत्यू झाल्याची तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव-शिर्डी रस्त्यावर रविवारी दुपारी घडली. या अपघातात महिलेचा पती बचावला आहे. आरती सुभाष राऊत (वय ३५, रा. वणी बाबापूर, जि. नाशिक) ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. आरती राऊत या त्यांचे पती सुभाष गुलाब राऊत (वय ४०) यांच्यासोबत दुचाकीवरून लासलगाव-शिर्डी रस्त्याने रविवारी लोणी येथे शिक्षण घेत असलेली श्रद्धा हिला भेटण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी निघाल्या होत्या.

हे दोघे कोळपेवाडी शिवारात असताना त्यांना एमएच १८ बीजी ६५७९ क्रमांकाच्या ट्रकने पाठीमागून धडक
दिली. त्यामुळे दोघे खाली पडले.आरती राऊत या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुभाष राऊत बाजूला फेकले
गेल्याने बचावले. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सुभाष राऊत यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक योगेश सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles