Tuesday, May 28, 2024

200 युनिट वीज मोफत, सर्वांना मोफत शिक्षण, पिकांना हमीभाव…’आप’ची गॅरंटी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनावर बाहेर येताच भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘पंचाहत्तरी’चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उत्तरे देताना भाजपची दमछाक होत आहे. तर रविवारी ‘मोदी की गॅरंटी’ला ‘केजरीवाल की गॅरंटी’ने प्रत्युत्तर देण्यात आले. चीनच्या ताब्यातील जमिनीची मुक्तता, दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा यासह १० आश्वासने आम आदमी पक्षाने दिली आहेत.

●चीनने ताब्यात घेतलेली जमीन मुक्त करणार

●दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

●पहिल्या २०० युनिटपर्यंत मोफत वीज

●सर्वांसाठी मोफत शिक्षण, सरकारी शाळांचे आधुनिकीकरण

●सरकारी रुग्णालयांत खासगीप्रमाणे आरोग्य सुविधा

●दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या

●‘अग्निवीर’ गुंडाळणार

●पिकांना स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार एमएसपी

●देशाची भ्रष्टाचारातून संपूर्ण मुक्तता करणार

●जीएसटी प्रणाली अधिक सुलभ करणार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles