Sunday, December 8, 2024

आमिर खान मुंबई सोडून ‘या’ शहरात होणार शिफ्ट; ‘हे’ आहे मोठं कारण

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान नेहमीच चर्चेत असतो. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आमिरने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, आता आमिर नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आमिर लवकरच मुंबई सोडून चैन्नईत शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
आमिरची आई चैन्नईत राहते. चैन्नईत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आमिरला आपला पूर्ण वेळ आईबरोबर घालवायचा करायचा आहे. त्यामुळे तो चैन्नईत शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. आईवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये आमिर खान राहणार आहे. आमिर कामासोबतच आपल्या कुटुंबालाही नेहमी वेळ देताना दिसतो.
आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात शेवटचा दिसला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला होता. त्यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेतला होता. अलीकडेच आमीरने त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात आमिरबरोबर जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles