नेवासा, जि. अहमदनगर येथे नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर जनसभा झाली. यावेळी अजित फाटके यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य या आम आदमीच्या प्रश्नांना केंद्रबिंदू मानून पुढील वाटचाल करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, स्थानिक पदाधिकारी व नेवासा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसाला प्रतिटन ₹ ४७०० भाव, शेतीला अन्न व ऊर्जा आधारित बनवून शेतकऱ्यांना समृद्ध करणे हाच आम आदमी पक्षाचा संकल्प!
~अजित फाटके पाटील