मुंबई : देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्याकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला नोंदणीसाठी ‘आभा’ कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या या निर्णयामुळे आता सर्वांनाच आभा कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे.