Saturday, March 2, 2024

अहमदनगरमधील पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी सुरतमध्ये सापडली ! आरोपी जेरबंद

अहमदनगर -अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुरत येथून शोधून काढले आहे.

तसेच या प्रकरणी आरोपी दत्तात्रय दादासाहेब गवारे (वय-२५, रा.कोळीवाडी, तालुका राहुरी) यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात 48 तासात न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास PSI धर्मराज पाटील यांनी केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात PSI धर्मराज पाटील, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.गणेश लिपणे, मपोहेकॉ. राधिका कोहकडे यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles