Monday, March 4, 2024

त्रिकोणी प्रेमातून धक्कादायक कृत्य पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून, नगर तालुक्यातील घटना

देहरे (ता. नगर) येथून तीन दिवसांपूर्वी पळवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिला मारहाण करण्यात आली. तसेच विहिरीत ढकलूनतिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी दाखल गुन्ह्यात
नातेवाईकांनी दिलेल्या जबाबावरून गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. तसेच, दोन आरोपींचा करण्यात आला आहे.समावेश आपल्या बोलत प्रियकराशी असल्याच्या रागातून आरोपी मुलीने असलेल्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आले आहे.

आरोपींमध्ये अल्पवयीन मुलीसह गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव (रा. देहरे) यांचा समावेश असून,दोघांना ताब्यात घेण्यात आले.अल्पवयीन मुलीला १३ जानेवारीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी देहरे येथील
एका विहिरीत आढळून आला.नयाबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचीमाहिती मुलीच्या नातेवाईकांना
देण्यात आली.

गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याचे आरोपी अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते.तसेच तो मृत मुलीशीही बोलत होता.ही बाब आरोपी अल्पवयीन मुलीला
खटकली. यातूनच त्या अल्पवयीन मुलीने तिला मारहाण केली व तिला देहरे शिवारातील जाधव वस्तीकडे घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने गोट्या उर्फ ऋत्वीक याच्या मदतीने तिला हत्याराने डोक्यात मारहाण करून विहिरीत ढकलून तिचा खून केला,असे जबाबात म्हटले आहे. त्यानुसार
पोलिसांनी खून, अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतबालसुधारगृहात पाठवले आहे, तर
गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. आरोपीला २२जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles