Thursday, July 25, 2024

Ahmednagar news:बंदुकीचा धाक दाखवून सरपंचाकडून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण

बंदुकीचा धाक दाखवून सदस्याचे अपहरण, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल !

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उर्फ बंटी भाऊसाहेब उबाळे व उपसरपंच अनुराधा अनिल ठवाळ यांच्या विरोधात दि.५ जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता त्याचा फैसला आज दि.१० रोजी होणार होता परंतु त्या आधी काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना कर्जत तालुक्यातील माहिजळगाव बायपास बसस्टॅण्ड नजीक घडली असून सदर घटनेबाबत दीपक दादाराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह सहा अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
इतर ग्रामपंचायत सदस्यांसह राऊत हे सांगोल्याहून परत येत होते. ते माहिजळगाव बायपास याठिकाणी पाण्याची बाटली घेण्यासाठी एका टपरीवर थांबले तेव्हा एक चॉकलेटी रंगाची वरना कार व एक काळ्या रंगाची क्रियटा कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी नितीन गव्हाणे यांना मारहाण करत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांना घेऊन गेले.

यावेळी त्या कार मध्ये सरपंच शिवप्रसाद उबाळे हे बसलेले होते जाताना त्या अज्ञात व्यक्तींनी आमच्या नादी लागायचे नाही असे म्हणत दमदाटी करत राऊत यांच्या कारची चावी या लोकांनी काढून नेली. राऊत यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी अपहरण झालेल्या नितीन गव्हाणे यांचा शोध घेतला पण ते मिळून आले नाहीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles