अब्दुल सत्तार यांनी अनेकांच्या जीमिनी हडप केल्या आहेत. मंत्री झाल्यापासून त्यांचे जनतेवरील अत्याचार अधिकच वाढले असल्याचा आरोप करत काही समाजिक कार्यकर्त्यांनी आज औरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर शिवसेनेला भाजपचा हा आणखी एक धक्का मानला जात आहे.
मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा द्या… भाजपचे रस्त्यावर उतरून आंदोलन…
- Advertisement -