Wednesday, April 17, 2024

नगरमध्ये २४ फेब्रुवारी रोजी सोशल मिडिया स्टार अभी मुंडे यांचा विशेष कार्यक्रम

नगरमध्ये २४ फेब्रुवारी रोजी सोशल मिडिया स्टार अभी मुंडे यांचा विशेष कार्यक्रम

नगर: सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेल्या अभी मुंडे यांची ‘राम’ ही कविता संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नागरिकांनी या कवितेला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. आता राम याच विषयावर अभी मुंडे यांचा विशेष कार्यक्रम नगरमध्ये शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सहकार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कविता, डान्स आणि स्टॅण्ड अप कॉमेडी असे सादरीकरण मुंडे करणार आहेत.

अभी मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या कविता, एकपात्री सादरीकरणातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. युवा वर्गाला भावतील असे विषय ते प्रभावीपणे मांडत असतात. सायको शायर म्हणून ते ओळखले जातात. भारतीय पौराणिक कथा, त्यातील पात्र यांच्या विषयी ते कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतात. महाभारतातील कर्ण या व्यक्तीरेखेवरील त्यांची कविता चाहत्यांना भावली. पंढरपुरात आपण बघतो की वारीला कित्येक लोक जातात. प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये न जाता केवळ कळसाचे दर्शन घेतात आणि पुन्हा येतात. मंदिराच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन परत येतात. याचे कारण म्हणजे त्यांना माहिती आहे की ,आपण चाललोय आपल्या सोबत विठ्ठल चालत होता. आपल्या शेतामध्ये विठ्ठल होता. ही परंपरा महाराष्ट्राची आहे. जी आपण जपली पाहिजे. अशा प्रकारचा राम आपणही अयोध्येमध्ये शोधला पाहिजे, असे विचार अभी मुंडे मांडत असतात.अधिक माहितीसाठी संपर्क: 9156537565/8308499301.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles