Tuesday, February 27, 2024

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

मुंबईच्या दहिसर परिसरात गुरुवारी (८ फेब्रुवारी) एक भयानक घटना घडली. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर आरोपीने स्वत:ला देखील संपवलं. या थरारक घटनेनं मुंबईसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली.

गेल्या १० दिवसात मुंबईत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा जलद गतीने तपास व्हावा, यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी माहिती दिली आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या जुन्या वादातून झाली असावी, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही हत्या प्री प्लान असून आरोपी मॉरीस याने घोसाळकर यांना फोन करून आपल्याला ऑफिसला बोलावून घेतलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत त्यांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून आम्ही पुरावे ताब्यात घेतले असून हत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असंही गुन्हे शाखेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय नवीन माहिती समोर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, या घटनेनं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles