Tuesday, June 25, 2024

Ahmednagar crime: मोक्क्याचे गुन्ह्यातील फरार आरोपी 5 साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेकडुन ताब्यात

अहमदनगर-मोक्क्याचे गुन्ह्यातील फरार आरोपी वाळुंज बायपास, अहमदनगर येथे दरोड्याचे तयारीत असतांना त्याचे 05 साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेकडुन ताब्यात..

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे पथक अहमदनगर जिल्ह्यातील चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 03/06/2024 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत, इसम नामे भरत विलास भोसले रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड हा त्याचे 8 ते 9 साथीदारांसह चार मोटारसायकलवर येवुन अहमदनगर ते सोलापुर जाणारे रोडवर वाळुंज बायपासचे लगत अंधारामध्ये थांबुन कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत थांबलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या. पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी अहमदनगर ते सोलापुर जाणारे रोडवर वाळुंज बायपास जवळ जावुन खात्री करता अंधारात रोडचे कडेला, काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच पथक त्यांना पकडण्यासाठी जात असतांना अंधारामध्ये थांबलेले 03 इसम त्यांचेकडील दोन मोटारसायकल चालु करुन भरधाव वेगात सोलापुर रोडने निघुन गेले. उर्वरीत 06 इसमांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) भरत विलास भोसले वय – 45 वर्षे, रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड, 2) रावसाहेब विलास भोसले वय – 47 वर्षे, रा. सदर, 3) अजिनाथ विलास भोसले वय – 35 वर्षे, रा. सदर, 4) बबलु रमेश चव्हाण वय – 24 वर्षे, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापुर, 5) कानिफ कल्याण भोसले वय – 20 वर्षे, रा. पारोडी, ता. आष्टी, जि. बीड, 6) अभिष छगन काळे वय 24 वर्षे, रा. अंतापुर, ता. गंगापुर, जि. छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे 7) कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड(फरार), 8) कृष्णा विलास भोसले रा. हातोळण, ता. आष्टी, जि. बीड(फरार), 9) विनोद जिजाबा भोसले रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड (फरार) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात 1 तलवार, 1 सुरा, 02 लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरचीपुड, मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकुण 1,60,300 /- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ/310 अमोल पोपट कोतकर यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 513/2024 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे भरत विलास भोसले हा 1) नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 434/2021 भादवि कलम 395, 397, आर्म ऍ़क्ट कलम 3/25, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1)(ii), 3 (2), 3(4), 2) नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 147/2009 भादवि कलम 399, 402 या गुन्ह्यामध्ये तसेच आरोपी नामे कानिफ कल्याण काळे भोसले हा श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 1) 227/2022 भादवि कलम 457, 380 व 2) 147/2009 भादवि कलम 399, 402 या गुन्ह्यामध्ये फरार आहेत.
आरोपी भरत विलास भोसले हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द अहमदनगर, सोलापुर, बीड, पुणे जिल्ह्यामध्ये मोक्का, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण 21 गुन्हे, आरोपी रावसाहेब विलास भोसले याचेविरुध्द अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण 14 गुन्हे, आरोपी नामे अजय विलास भोसले याचेविरुध्द पुणे, बीड, अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकुण 21 गुन्हे, आरोपी बबलु रमेश चव्हाण याचेविरुध्द कर्नाटक राज्य व सोलापुर जिल्ह्यामध्ये खुन, दरोडा, घरफोडीचे एकुण 03 गुन्हे, आरोपी नामे कानिफ कल्याण भोसले याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, घरफोडीचे एकुण 4 गुन्हे, आरोपी नामे अभिष छगन काळे याचेविरुध्द छ. संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, घरफोडीचे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles