Monday, September 16, 2024

महानगरपालिकेच्या तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर ACB कडून गुन्हा दाखल

अपसंपदा कारवाई

▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
▶️ आलोसे- १) श्री अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक
२) श्रीमती निशा अनिल महाजन (खाजगी इसम)
▶️ अपसंपदा रक्कम-
१,३१,४२,८६९/-रुपये (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये)
▶️ * हकीगत*
आलोसे श्री अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १,३१,४२,८६९/- (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये ) कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२% एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने, तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी आरोपी क्रमांक २ यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे आज दिनांक ०८/०८/२०२४ रोजी १६.४४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles