नगर – सोलापूर रस्त्यावर शिराढोन जवळ बोलेरो गाडी आणि मालवाहू डंपर यांची समोरा समोर धडक होऊन बोलेरो चालक गुणवडी येथील रहिवासी मंगेश नागवडे यांचे जागीच अपघाती निधन झाले आहे.महामार्गाचे काम चालू आहे , रस्ता प्रशासनाने डायवर्जन पारदर्शी दाखवले नसल्याने हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे.नगर कडे व सोलापूर कडे जाताना कधी कधी दोन्ही बाजूने एकाच मार्गावरून गाड्या जातात याच परिणाम अपघातात होतो आहे.नगरला शासकीय रुग्णालयात पंचनामा करून सायंकाळी पाच वाजता गुणवडी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्व.मंगेश नागवडे यांचे वय ३७ असून त्यांच्या मागे पत्नी , दोन मुले , एक मुलगी , तीन बहिणी , आई – वडील असा मोठा परिवार आहे.
नगर सोलापूर रोडवर बोलेरो-डंपरचा भिषण अपघात, नगर तालुक्यातील युवक ठार
- Advertisement -