अहमदनगर दौंड महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सातजखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटा मार्ग नबीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दयांमध्ये दर्शनासाठी महिंद्रा झायलो (क्र. एमएच ०४ ईडी ७१२६) या कारमधून येत होते.
रविवारी सकाळी ७ वाजता घारगाव परिसरात नगर दौड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर समोरून भरधाव वेगाने नगर कडून दौडकडे सीएनजी गॅस बाहतूक करणारा टेम्पो (क्र. एचआर ५५, एपी १९९६४) शी कारची समोरासमोर भीषण घड़क झाली. या अपघातात दोन मुलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
रोहबान अजिज शेख (३०), गाझी रौफ शेख (१३), तुझेन शोएब शेख (१३, रा.सर्व कल्याण, मुंबई) असे तिन्ही मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे असून रिजवाना अजिज शेख (५७), रिम शोएब शेख (३२), फायजा शोएब शेख (९), शादिन शोएच शेख (११), सना अब्दुल रौफ शेख (३७), अब्दुल रहीम शेख (८), मदिहा शहबाज शेख (२७) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.