Friday, December 1, 2023

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

पुणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पायी जात असलेल्या तरुणीसह दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे
जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात घडली. या घटनेनं ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्ष) असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतुजा डुंबरे ही रस्त्याने घरी चालत जात होती.
त्याचवेळी गीताराम तांबे आणि त्यांची पत्नी सविता हे दोघे पती-पत्नी दुचाकीवरुन आळेफाट्याच्या दिशेने जात होते. अचानक भरधाव वेगात एक पिकअप आला. काही कळण्याच्या आत या पिकअपने रस्त्याने चाललेल्या तरुणीसह आणि दुचाकीवरील पती-पत्नीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पिकअप वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. ओतूर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: