Saturday, January 25, 2025

अहमदनगर पाथर्डी रोडवर अपघात महिलेचा जागीच मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळील कान्होबावाडी फाटा येथे देवराई कडून करंजीकडे पायी प्रवास करत असलेल्या महिलेला शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव कमल अशोक लंबे (रा. बगडी ता-गंगापूर जि-छत्रपती संभाजीनगर) येथील असून अपघात घडल्यानंतर करंजी पोलीस औट पोस्टचे सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी,भगवान टकले यांनी घटनास्थळी जाऊन या महिलेचा मृतदेह पाथर्डी येथे शवविच्छेदनासाठी रवाना केला.

या महिलेसोबत इतर कोणीही नसल्यामुळे या महिलेची शुक्रवारी सायंकाळी ओळख पटली. त्यानंतर साकेगाव तालुका पाथर्डी येथील या महिलेच्या नातेवाईकांनी बगडी तालुका गंगापूर या ठिकाणी महिलेच्या कुटुंबांना कळवले व त्यानंतर या महिलेचा मृतदेह कुटुंबियाकडे स्वाधीन करण्यात आला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी, भगवान टकले करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles