Tuesday, March 18, 2025

अहमदनगर सोलापूर रोडवर अपघात, २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरील अन्य दोन जण जखमी झाले आहेत. नगर – सोलापूर महामार्गावर वाटेफळ (ता.नगर) गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.२९) सकाळी हा अपघात झाला.

अश्पाक संजय काळे (वय २५, रा. वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजी नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत काळे व त्याच्या समवेत अन्य दोघे असे तिघेजण नगर हून सोलापूरच्या दिशेने मोटारसायकल वर जात असताना शुक्रवारी (दि.२९) सकाळी ९.३० च्या सुमारास वाटेफळ (ता.नगर) गावच्या शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकल ला जोराची धडक दिली. या धडकेने मोटारसायकल वरील तिघे जण रस्त्यावर खाली पडले. त्यातील अश्पाक काळे हा गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. या जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी नेवासा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर मयत अश्पाक काळे याच्या मृतदेहाचे दुपारी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तपासी अंमलदार रमेश गांगर्डे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles