Saturday, February 15, 2025

नगर- कल्याण रोडवर ३ वाहनांचा भीषण अपघात…६ जणांचा मृत्यू,मयत सर्व अहमदनगर जिल्ह्यातील

नगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूरी फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला.
या अपघातात निलेश रावसाहेब भोर -देसवडे ,प्रकाश रावसाहेब थोरात-वारणवाडी ( ता- पारनेर )अशोक चिमा केदार जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी-जांबुत खुर्द ( ता – संगमनेर) सचिन कांतीलाल मंडलीचा-टाकळी मानूर ( ता- पाथर्डी ) हे मयत झाले आहेत, तर भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एसटी चा पत्र लागल्याने सुयोग अडसूळ -जखमी देवेंद्र गणपत वाडेकर, व बद्रीनाथ विठ्ठल जगताप हे तिघेजण जखमी झाले आहेतया घटनेची माहिती मिळतात सहा.पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनाही दाखल होऊन पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles