Sunday, July 14, 2024

सायकलवर पंढरपूरला निघालेल्या अहमदनगरच्या तरुणाचा अपघाती मृत्यू

नगर – पंढरपूर येथे देव दर्शनासाठी सायकलवर निघालेले कानिफनाथ मारुती कोतकर (वय -३७, रा. निंबळक ता.नगर) यांना पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक गाडीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले आहेत. कुरकुंभ एमआयडीसी परीसरात शनिवारी (दि.६) ही दुर्दैवी घटना घडली.

नगर एमआयडीसी मधील स्नायडर कंपनीतील शंभर कामगार तसेच नगर सायकलिंग ग्रुपचे तरूण पंढरपूर येथे दर्शनासाठी शनिवारी पहाटे पाच वाजता नगरहून सायकलवर मार्गस्थ झाले होते. दौंडच्या पुढे कुरकुंभ परीसरा जवळ जात असताना मालवाहतुक गाडीने कानिफनाथ कोतकर यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे ते जागेवर खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मयत कोतकर हे स्नायडर कंपनी मध्ये उच्च पदावर काम करत होते. त्यांचा गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच सहभाग असायचा. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. निंबळक येथील सेवा सोसायटी संचालिका ज्योती कोतकर यांचे ते पती होते. त्याच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुली, भाऊ असा परीवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles